Home Breaking News झाडाला गळफास लावून आत्महत्या

झाडाला गळफास लावून आत्महत्या

1179

राजूर इजारा शिवारातील घटना 

मिस्त्री काम करणाऱ्या 35 वर्षीय इसमाने राजूर इजारा शिवारातील नींबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे.

संतोष वांढरे असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.तो नेत या गावातील रहिवाशी असून तो मिस्त्री काम करीत होता.दि 3 डिसेंबर ला राजूर इजारा येथील स्मशानभूमी मार्गावर असलेल्या नींबाच्या झाडाला अंगातील बनियान फाडून त्याचा फास तयार केला व आत्महत्या केली.

या बाबत गावकऱ्यांना माहिती मिळताच पोलिसांना सूचना देण्यात आली असून जमादार वासुदेव नारनवरे व निरंजन खिरटकर घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.त्याने नेमकी आत्महत्या का केली याची माहिती मिळू शकली नाही.

वणी :बातमीदार