● पालिका प्रशासनाचा फतवा
कोरोना विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दोन्ही लस घेणे गरजेचे आहे. प्रशासन वेळोवेळी आवाहन करताहेत. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करितांना दिसत आहे. त्यामुळेच नगर पालिका प्रशासनाने लसीकरण करा अन्यथा पालिकेत प्रवेश बंदी असा निर्णय घेतला आहे.
मागील दोन वर्षा पासून कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दोन वेळा आलेल्या लाटेने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
नागरिकांना केंद्र सरकारने निशुल्क लस उपलब्ध करून दिल्या आहे. आरोग्य विभाग, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर लसीकरणांचे शिबिर लावले जात आहे. मात्र काही नागरिक लस घेण्यास तयार नसल्याने प्रशासनाने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.

नगर पालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन लस न घेतलेल्या नागरिकांचा सर्वे केला आहे. प्रत्येक प्रभागात लसीकरणांचे शिबीर लावले जात आहे. संपूर्ण शहराचे 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्धिष्ट ठेऊन कामाला लागले आहे.
शहरातील काही महाभाग लस घेण्यास तयार नसल्याने आता पालिका प्रशासनाने नवा फतवा जारी केला आहे. दोन्ही डोज न घेणाऱ्यांना आता पालिकेत प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
नागरिकांना आता लसीचे प्रमाणपत्र दाखवल्या शिवाय पालिकेत कामानिमित्त जाता येणार नाही. त्यामुळे आता तरी ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार