● आरोपी अटकेत, गुन्हा दाखल
मारेगाव: शेत पिकावर चोरट्याने लक्ष केंद्रित केले असून बुधवार दि. 5 जानेवारीला रात्री मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा येथे सोयाबीन चे 16 कट्टे लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या घरी कापूस, सोयाबीन, तूर अश्या पिकाची आवक सुरू झाली आहे. आपापल्या परीने साठवणूक केल्या जात आहे. हिवरा मजरा येथील शेतकरी सुमित मनवर बोधाने (29) यांनी घराच्या समोरील टिनाच्या शेड मध्ये सोयाबीन चे कट्टे ठेवले होते.
दिलीप लाहाणु रामपुरे (38) असे अटकेतील व्यक्तीचे नाव असून तो हिवरा मजरा येथील रहिवासी आहे. दिलीप व त्याच्या मित्राने संगनमत करून सोयाबीन चे कट्टे चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बोधाने यांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी भादवि कलम 461, 380 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मारेगाव: बातमीदार