Home Breaking News बारावीतील विद्यार्थीनीची गळफास लावून आत्महत्या

बारावीतील विद्यार्थीनीची गळफास लावून आत्महत्या

2213

पठारपूर येथील घटना

वणी: तालुक्यातील पठारपूर येथे गुरूवार दि. 13 जानेवारीला दुपारी बारावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

श्रध्दा धनराज पेचे (17) असे मृतक विद्यार्थिनींचे नाव आहे. ती पठारपूर येथील निवासी असून कायर येथील महाविद्यालयात बारावीत शिकत होती. गुरुवारी दुपारी घरी कोणीही नसल्याची संधी साधून तिने आपल्या घरातच गळफास घेतला.

काही कालावधी तिचे वडील धनराज पेचे हे कायर वरून घरी परतले असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत श्रध्दा दिसून आली. त्यांनी आजूबाजूच्या शेजाऱ्यांना बोलावले तसेच मुकुटबन पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता पाठवला आहे. तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही.
वणी : बातमीदार

Previous articleसंभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी ‘नयन लुंगे’
Next articleराजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.