Home Breaking News गळफास लावून युवकाची आत्महत्या

गळफास लावून युवकाची आत्महत्या

1316

नांदेपेरा येथील घटना

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील 29 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

सुर्यभान रामदास वडस्कर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सोमवार दि 17 जानेवारीला सायंकाळी 7 वाजताचे सुमारास घरा लगत असलेल्या शेतातील निंबाच्या झाडाला त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती मिळू शकली नाही.

वणी: बातमीदार