Home Breaking News खळबळजनक….माजी सरसंघचालक ‘हेडगेवार’ गुलाम होते…!

खळबळजनक….माजी सरसंघचालक ‘हेडगेवार’ गुलाम होते…!

1121

नितीन राऊत यांचा घणाघाती आरोप

वणी: माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दि. 24 जानेवारीला प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी खळबळजनक विधान करत माजी सरसंघचालक ‘हेडगेवार’ हे ब्रिटिशांचे गुलाम होते असा आरोप केला.

येथील शेतकरी मंदिरात भव्य प्रवेश सोहळ्याचे आयोजन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर, नितीन राऊत, संध्याताई सव्वालाखे, शिवाजीराव मोघे, वाजहत मिर्झा यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.

पक्ष प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश घेतला. याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. याचवेळी उर्जा मंत्री राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यावेळी संबोधन करताना म्हणाले की, कालच सुभाषचंद्र बोस यांची जयंती झाली. कुठेतरी वाचलं की नाशिक ला सरसंघचालक हेडगेवार मुक्कामी होते. त्यांना भेटण्यासाठी बोस यांनी खाजगी सचिवाला निरोप घेऊन पाठवले.

त्यावेळी “हेडगेवार यांनी टिंगल उडवत भेट नाकारली व म्हणाले की, त्यांना सांग की मी आजारी आहे. मी जर त्यांना भेटलो तर ब्रिटिश माझ्या सोबत काय करतील, मला जेल मध्ये टाकतील” हे वाक्य बाहेर उभा असलेल्या खाजगी सचिवांने ऐकलं असा गौप्यस्फोट यावेळी राऊत यांनी केला.

असे हे गुलाम लोकं आज आपल्याला शिकवायला लागले असून जाती धर्मात तेढ निर्माण करत असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला. नुकतेच नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य करून रोष ओढून घेतला आहे त्यातच राऊत यांच्या विधानाने खळबळ माजणार का हे काही कालावधीतच स्पष्ठ होणार आहे.

हे लोक सत्तेसाठी हपापलेले आहे.त्यामुळे ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हिंदुवादी संघटनांचा विरोध करणे हे त्यांचे नेहमीचे काम आहे.त्याला इतिहास माहीत नसल्याने ते बेताल वक्तव्य करीत आहे.अश्या लोकांना संघ थारा देत नाही
प्रशांत भालेराव
जिल्हा सह कार्यवाहक

                               वणी: बातमीदार