Home Breaking News त्या विधानाचा निषेध….नितीन राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

त्या विधानाचा निषेध….नितीन राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

948

भाजपा पदाधिकारी आक्रमक

वणी: शहरात सोमवारी ऊर्जा मंत्र्यांनी सरसंघचालक डॉ हेडगेवार याचे बाबत बेताल वक्तव्य केले. यामुळे संघपरिवार व भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. मंगळवारी सकाळी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात टिळक चौकात नितीन राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

वणी येथील शेतकरी भवनात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दि. 24 जानेवारीला प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्याने वणीत याचे चांगलेच पडसाद उमटले.

आयोजित कार्यक्रमात राऊत म्हणाले की, नाशिक ला सरसंघचालक हेडगेवार यांना भेटण्यासाठी बोस यांनी खाजगी सचिवाला पाठवले होते त्यावेळी “हेडगेवार यांनी टिंगल उडवत भेट नाकारली व म्हणाले की, त्यांना सांग की मी आजारी आहे. मी जर त्यांना भेटलो तर ब्रिटिश माझ्या सोबत काय करतील, मला जेल मध्ये टाकतील” हे वाक्य बाहेर उभा असलेल्या खाजगी सचिवांने ऐकलं असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला होता.

ऊर्जा मंत्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संघ परिवार व भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड दुखावल्या. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी 6 वाजता आमदार बोदकुरवार यांच्या नेतृत्वात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, संजय पिंपलशेंडे, श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गेवार, आरती वांढरे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार