Home Breaking News वाहतूक शाखेचे सपोनि मुकुंद कवाडे यांची बदली

वाहतूक शाखेचे सपोनि मुकुंद कवाडे यांची बदली

715
पोलीस निरीक्षक पदावर बढती

वणी :- जिल्हा वाहतूक उपशाखा वणी येथील वाहतूक निरीक्षक पदावर कार्यरत मुकुंद कवाडे यांची पदोन्नती झाल्याने त्यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. या बाबतचा आदेश बुधवारी निर्गमित झाला आहे.

अप्पर पोलीस महासंचालक मुंबई यांनी राज्यातील 453 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर बढती दिली आहे. यामध्ये वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांची पोलीस निरीक्षक पदावर वर्णी लागली आहे.

आठ महिन्या पूर्वी ते वणी उपविभागात रुजू झाले होते. जिल्ह्या पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाचे ते प्रमुख असताना त्यांनी दणदणीत कारवाया करून अवैद्य व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडले होते. शिरपूर, वणी, वडकी, पांढरकवडा पोलीस स्टेशन हद्दीतील त्यांनी केलेल्या कारवाया त्यांची कार्यप्रणाली अधोरेखित करणाऱ्या होत्या.

कालांतराने पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक बरखास्त करून कवाडे यांना जिल्हा वाहतूक शाखेच्या वणी उपशाखेत प्रमुख म्हणून नियुक्त केले. त्यांनी वाहतूक शाखेत सुध्दा आपल्या कार्याची छाप पाडली. त्यांची पदोन्नती झाल्यामुळे रिक्त जागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार