Home वणी परिसर आज भारतरत्न लता मंगेशकर यांना वणीकरांच्या वतीने श्रद्धांजली

आज भारतरत्न लता मंगेशकर यांना वणीकरांच्या वतीने श्रद्धांजली

476

नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन

वणी : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं रविवार दि. 6 फेब्रुवारी ला निधन झालं. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. त्यांना आज 7 फेब्रुवारी ला दुपारी चार वाजता वणीकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांचे वर मुंबई येथील रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. रविवारी त्यांची प्राण ज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजाने जगाला भुरळ घातली होती. अशी महान गायिका पुन्हा होणे नाही.

येथील प्रभू श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता येथील शिवाजी पुतळ्या समोर दुपारी चार वाजता वणीकरांनी श्रद्धांजली वाहण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन रवी बेलूरकर यांनी केले आहे.
वणी: बातमीदार

Previous articleमांजा’ मुळे विद्यार्थीनीचा गळा चिरला
Next articleथरार….तरुणावर चाकूहल्ला आणि पोलीस ठाण्यापर्यंत पाठलाग…!
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.