Home वणी परिसर डॉ.रोहित वनकर यांची समन्वयकपदी निवड

डॉ.रोहित वनकर यांची समन्वयकपदी निवड

257

● करियर कट्टा ठरणार विद्यार्थ्यांचे आकर्षण

वणी :- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करियर कट्टा या उपक्रमाअंतर्गत करिअर कट्टा यवतमाळ विभाग जिल्हा समन्वयक पदी डॉ.रोहित वनकर नुरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालय वणी यांची नियुक्ती करण्यात आली.

यशवंत शितोळे अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांनी यवतमाळ जिल्हा समन्वयक पदी डॉ. रोहित वनकर यांची निवड केली. करियर कट्टा उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. करिअर कट्टा उपक्रमा अंतर्गत राज्यभर सुरु असलेल्या IAS आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला तसेच वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी व भारतीय संविधानाचे पारायण हे उपक्रम राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविद्यालयातील करियर कट्टा विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरणार आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. रझ्झाक अहमद, संस्थेच्या सचिव डॉ.रानानूर सिद्दीकी यांनी अभिनंदन केले.
वणी: बातमीदार