Home Breaking News शिवतीर्थावर ढोलताशांच्या गजरात ‘शिवजयंती’

शिवतीर्थावर ढोलताशांच्या गजरात ‘शिवजयंती’

157

तरूणाई चा उत्स्फूर्त सहभाग

वणी : शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली. येथील शिवतीर्थावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर ढोलताशांच्या गजरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवजयंती निमित्ताने सर्वत्र भगवे वादळ बघायला मिळाले तर तरूणाई चा उत्स्फूर्त सहभाग लक्ष वेधून घेत होते. ढोल ताशांच्या गजरात चाललेला जल्लोष, डौलात मिरवणाऱ्या भगव्या पताका आणि थिरकणारे तरुण, जयघोषाचा निनाद उत्साह निर्माण करणारे होते.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी ला साजरी केली जाते. गेले दोन वर्ष करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जयंती धुमधडाक्यात साजरी झाली नाही परंतु यंदा शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात येत आहे.

वणीत विविध विविध संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम, व्याख्यान, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष इझहार शेख यांनी समाज बांधव व कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन केले. त्यातच शिवतीर्थावर शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तरुणाई उत्साहाने सहभागी झाली होती.

वणी: बातमीदार