Home Breaking News भीषण…..मेहंदी सुखायच्या आत काळाचा घाला, पाच जागीच ठार…!

भीषण…..मेहंदी सुखायच्या आत काळाचा घाला, पाच जागीच ठार…!

2660

माहेरी जात असताना घडली घटना
वाहनाचा चुराडा, ट्रक ने दिली धडक

उमरखेडवसंत देशमुख : उमरखेड तालुक्यातील साखरा येथे वास्तव्यास असलेल्या तरुणासोबत तीन दिवसापूर्वी लग्न झालेली नववधू परतणीचा कार्यक्रम करून माहेरी जात असताना वाहनाला जबर अपघात झाला. सोमवार दि. 21 फेब्रुवारी ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास भोकर – हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर सोमठाणाजवळ झालेल्या अपघातात वाहनातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मेहंदी सुखायच्या आत काळाने घाला घातल्याने खळबळ उडाली आहे.

अपघातातील जखमींना नांदेड व भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील महिंद्रा मॅक्झिमो मिनी व्हॅनचा (एम.एच.29 एआर 3219) अक्षरशः चुराडा झाला आहे.

नववधू ही धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील आहे. तीन दिवसापूर्वी तिचा उमरखेड तालुक्यातील साखरा येथील तरुणासोबत लग्न झाले होते. परतणीचा कार्यक्रम आटोपून नातेवाईकांसह मिनी व्हॅनमधून ती सासरी जात होती. या व्हॅनमध्ये 9 ते 10 जण प्रवास करीत होते. मृत आणि जखमींची नावे बातमी लिहिपर्यंत समजली नाहीत.

भोकर – हिमायतनगर 161 ए या क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील सोमठाणा येथे हा भीषण अपघात झाला. समोरून येणार्‍या ट्रकची (एम.एच.04 एएल 9955) आमनेसामने धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली गेल्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

जखमींना तातडीने नागरिकांनी उपचारार्थ रुग्णालयात हलवले मात्र या घटनेत नेमके कोण मृत्युमुखी पडले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
( बातमीचे अपडेट विस्तृत माहिती नंतर)
उमरखेड: बातमीदार

Previous articleशिवजयंती चे औचित्य साधून ‘निराधार सेवा सप्ताह’
Next articleआणि…नववधूसह पाच जणांचा मृत्यू ..एकुलत्या एक भावाचा समावेश
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.