Home Breaking News प्रख्यात शिल्पकार सोनकुसरे यांचा सत्कार

प्रख्यात शिल्पकार सोनकुसरे यांचा सत्कार

407

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य
मनसेने राबवले विविध उपक्रम

वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रविवार दि. 27 फेब्रुवारी ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिल्पकार अशोक सोनकुसरे यांचेसह पत्रकार, शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. तर मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्था यांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतनिमित्त मराठी भाषा दिन महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात येतो. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे महाराष्ट्र सैनिकांसमवेत विविध उपक्रम राबवतात.

शहरातील प्रसिद्ध शिल्पकार अशोक सोनकुसरे यांची संपूर्ण राज्यात ख्याती आहे. त्यांनी सोलापूर येथे रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखीव शिल्प मंत्रमुग्ध करणारे आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत मराठी भाषा दिनी उंबरकर यांचे हस्ते भावोत्कट सत्कार करण्यात आला.

पत्रकारिता करणाऱ्या शहरातील विविध वृत्तपत्रातील बतमीदारांचा यावेळी मनसेने सत्कार केला. यामध्ये सुनील पाटील- भास्कर, तुषार अतकारे- सकाळ, सागर बोढे- पुण्यनगरी, रमेश तांबे- युवाराष्ट्र, पुरुषोत्तम नवघरे- मातृभूमी, राजू धावंजेवार – मतदार, आरिफ शेख- लोकमत, परशुराम पोटे- हिंदुस्थान, जितु कोठारी- वणी बहुगुणी, गजानन कासावार- हितवाद, सौरभ परबत, मो. मुस्ताक, निलेश चौधरी- नवराष्ट्र, श्रीकांत किटकुले यांचा समावेश होता.

वणी विधानसभा क्षेत्रात मनसेचे चांगले प्राबल्य आहे. सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व जनहितार्थ उपक्रम राबविण्यात मनसेचा हातखंडा आहे. मराठी भाषा दिनानिमित्त मरेगाव येथे मराठी भाषेचे शिक्षक यांचा सत्कार सोहळा पार पडला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव शहराच्या वतीने मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम घेण्यात आला होता.

याप्रसंगी गोविंद थेरे, धनंजय त्रिम्बके, फाल्गुण गोहोकार, शिवराज पेचे, अजु शेख. मराठी भाषा संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पेंढरवाड, कार्याध्यक्ष नागोराव कोम्पलवार, उपाध्यक्ष लक्ष्मण काकरवार, कोषाध्यक्ष निशांत कपाट यांचेसह महाराष्ट्र सैनिक उपस्थिती होते.
वणी- बातमीदार