Home Breaking News भीषण…ट्रकच्या अपघातात एक ठार

भीषण…ट्रकच्या अपघातात एक ठार

2540

एका महिन्या पूर्वी झाला विवाह

वणी: मित्रासोबत ट्रक वर जाणे 30 वर्षीय युवकाला चांगलेच माहागात पडले आहे. वरोरा मार्गावर असलेल्या टी पॉईंट जवळ ट्रक पलटी झाल्याने सूरज चा मृत्यू झाला आहे. एका महिन्यांपूर्वी या युवकाचा विवाह झाला होता.

सूरज अमर मेडथे (ठाकूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो शहरातील सुभाषचंद्र बोस चौकात राहतो. दि 3 मार्चला रात्री तो ट्रक ड्रायव्हर असलेल्या मित्रा सोबत ट्रक वर गेला होता.

गुरुवारी मध्यरात्री वरोरा मार्गावरील टी पॉईंट वर ट्रक पलटी झाला. या मध्ये सूरज गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सूरज चा नुकताच 10 फेब्रुवारी ला विवाह झाला होता. सुखी संसाराचे स्वप्न बघत असतांनाच त्याचेवर नियतीने घाला घातला. सूरज हा मनमिळावू स्वभावाचा होता त्याच्या आकस्मिक मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वणी : बातमीदार