Home Breaking News महान फिरकीपटू शेन वॉर्नची ‘एक्झिट’

महान फिरकीपटू शेन वॉर्नची ‘एक्झिट’

165

हृदयविकाराच्या झटक्याने 52 व्या वर्षी निधन

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हा एक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे जो खेळाच्या इतिहासातील महान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यांच्या आकस्मिक एक्झिटने क्रिकेटप्रेमी वर शोककळा पसरली आहे.

वॉर्नने 1992 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला आणि 1000 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतरचा दुसरा गोलंदाज बनला. वॉर्न हा खालच्या फळीतील उपयुक्त फलंदाजही होता. तो एकमेव असा खेळाडू आहे ज्याने 3000 पेक्षा अधिक कसोटी धावा केल्या आहेत.

शेन वॉर्नने वयाच्या 23 व्या वर्षी 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2007 मध्ये सिडनीमध्येच इंग्लंड विरुद्ध खेळला होता.

वॉर्नने शुक्रवारी सकाळी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज रॉड मार्श यांच्या निधनावर ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी मार्श यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हे त्यांच्या आयुष्यातील शेवटचे ट्विट ठरले. त्यांचे शुक्रवार दि. 4 मार्चला तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची एक्झिट क्रिकेटप्रेमींना चटका लावणारी ठरणार आहे.