Home Breaking News चक्क….बँक संचालकानेच जोडले बनावट ‘FDR’

चक्क….बँक संचालकानेच जोडले बनावट ‘FDR’

3122

जि.प. बांधकाम विभागाची फसवणूक
प्रधान सचिवांकडे तक्रार

वणी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण येथे बँक संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार व शाखा व्यवस्थापक यांनी संगनमताने रुपये 18 लाख 10 हजार रुपयांची बनावट संकल्प मुदत ठेवी योजनेच्या पावत्या दि. 16 फेब्रुवारी 2022 रोजी बनवून बँकेची व जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. 1 यवतमाळ यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. रविवार दि. 6 मार्च ला पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केली आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. 1 यवतमाळ यांचे निविदा कंत्राटदार आर. एम. येल्टीवार यांनी निविदा क्र. 20 व 21 नुसार निन्मत्तम निविदा भरली. एखाद्या कंत्राटदाराणे निन्मत्तम निविदा भरल्यास त्या निविदे पोटी अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरावी लागते असा नियम आहे.

कंत्राटदार आर.एम. येल्टीवार हे स्वतः यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक आहे. सदर कंत्राटदाराने अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणून 18 लाख 10 हजार रुपयांच्या एकूण 16 पावत्या बनावट बनवून त्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सादर केल्या आहे. सदर पावत्या ह्या संगणकीय ऐवजी हाताने लिहिलेल्या असल्यामुळे शंका निर्माण झाली आणि फसवणुकीचे बिंग फुटले आहे.

सदर प्रकरणी कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार संचालक मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ यांनी व शाखा व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण यांनी शासनाची फसवणूक केल्याचे दिसून येते. या गंभीर प्रकरणाची शासनाने तात्काळ दखल घेवून फसवणुकीचे गुन्हे नोंद करावेत तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी प्रधान सचिवांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

यावेळी विजय पिदूरकर, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, संजय पिंपलशेंडे, प्रा. महादेव खाडे, गजानन विधाते, राम आईटवार, श्रीकांत पोटदुखे, दीपक मत्ते, संतोष डंभारे, बंडू चांदेकर, अनिल पावडे, राकेश बुग्गेवार सह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
वणी: बातमीदार