Home राजकीय युवक काँग्रेस अध्यक्षपदी दांडेकर तर उपाध्यक्ष पदी बोढे

युवक काँग्रेस अध्यक्षपदी दांडेकर तर उपाध्यक्ष पदी बोढे

1016
तब्बल तीन महिन्यांनी निकाल जाहीर

वणी :- वणी विधानसभा युवक काँग्रेसचे पदाधिकारी निवडीसाठी ऑनलाइन मतदान घेण्यात आले होते.यामध्ये राहुल दांडेकर याची वणी विधानसभा अध्यक्ष पदी तर पलाश बोढे याची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

युवकांनी राजकीय प्रवाहात यावे याकरिता युवक काँग्रेस ची स्थापना करण्यात आली आहे.या पूर्वी आमदार, खासदार, व मंत्री यांच्याच मुलांची पदावर वर्णी लागत होती.त्यामुळे कट्टर कार्यकर्ता उपेक्षित राहत होता.

याचीच दखल घेत पक्षश्रेष्ठींनी मतदान घेऊन निवड सुरू केली आहे. वणी विधानसभाचे पदाधिकारी निवड करण्यासाठी 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने मतदान घेण्यात आले होते.

या निवडणुकीत वणी तालुक्यातुन 5 तर झरी मधून 3 अश्या 8 युवकांनी आपली उमेदवारी दाखल केली होती.युवकांना सभासद करून त्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला होता.या करिता उमेदवारांनी जोरदार मोर्चे बांधणी केली होती.

तब्बल तीन महिन्यांनी सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला आहे.राहुल दांडेकर याला सर्वाधिक 4662 मते मिळाली तर पलाश बोढे यांना 4558 मते प्राप्त झाले आहे.बोढे हे 104 मतांनी मागे राहिल्याने दांडेकर याची विधानसभा अध्यक्षपदी तर बोढे याची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

विजयी उमेदवारांनी आपल्या यशाचे श्रेय खासदार बालूभाऊ धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार व काँग्रेस पदाधिकारी यांना दिले आहे.
वणी : बातमीदार

Previous articleनंदीग्राम एक्सप्रेस सुरू करण्यासाठी ‘क्रांती’…!
Next articleसराईत चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या ‘मुसक्या’
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.