Home Breaking News ‘संतोष’ चा संशयास्पद मृत्यू, गूढ उकलण्याचे आव्हान..!

‘संतोष’ चा संशयास्पद मृत्यू, गूढ उकलण्याचे आव्हान..!

1096

● नागपूर ला आढळला होता मृतदेह

वणी: येथील एका कोल वॉशरीत सुपरवायझर पदावर कार्यरत असलेल्या 45 वर्षीय युवकाचा संशयास्पद स्थितीत नागपूर ला मृतदेह आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा तपास सुरु असताना घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा तपास नागपूर पोलिसांनी वणी पोलिसांकडे सुपूर्द केल्याने त्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

येथील जुने कॉटन मार्केट परिसरात वास्तव्यास असलेला संतोष गोमकर (45) हा कंत्राटी म्हणून कोल वॉशरीत सुपरवायझर पदावर कार्यरत होता. 8 मार्चला रात्री तो नेहमीप्रमाणे शहरालगत असलेल्या रेल्वे सायडिंग वर कर्तव्यावर गेला होता. त्या क्षणापासून तो बेपत्ता होता.

गुरुवार दि. 10 मार्चला सायंकाळी कोरडी परिसरातील रेल्वे रुळालगत संतोषचा मृतदेह आढळून आला होता. मृतकाच्या खिशात असलेल्या बँक स्लिप मुळे त्याची ओळख पटली. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी वणी पोलिसांना सूचित केले.

‘संतोष’ च्या संशयास्पद मृत्यूने विविधांगी प्रश्न उपस्थित होत आहे. तो नागपूर जिल्ह्यातील कोराडी रेल्वे रूळ परिसरात नेमका कसा पोहचला, दोन दिवसानंतर कोळशाच्या ढिगाऱ्यात त्याचा मृतदेह आढळला. उत्तरीय तपासणीतील प्राथमिक अहवालात मृत्यूचे नेमके कारण काय ? या सर्व बाबीचा तपास वणी पोलिसांना करावा लागणार आहे.

व्हिजिलन्सचे पथक वणीत
संतोष गोमकर च्या मृत्यूचे रहस्य कमालीचे वाढले आहे. येथील रेल्वे सायडिंग वरून बेपत्ता होणे आणि तीन दिवसानंतर कोराडी परिसरात कोळशाच्या ढिगाऱ्यात त्याचा मृतदेह आढळणे ह्या बाबी गंभीर स्वरूपाच्या आहेत. पोलीस याचा उलगडा करत असतानाच दि.14 मार्चला वेकोलीच्या व्हिजिलन्स विभागाचे पथक दोन वाहनाने दाखल झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांनी वेकोली अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचे समजते. हे पथक नेमके कशासाठी आलेत, याची माहिती कळू शकली नाही मात्र ‘संतोष’ च्या मृत्यू संदर्भातच पथक दाखल झाल्याची माहिती विश्वसनिय सूत्राने दिली आहे.
वणी: बातमीदार

Previous articleधक्कादायक…युवतीची ओढणीने गळफास लावून आत्महत्या..!
Next articleत्या.. अपघातातील जखमी युवकाचा ‘मृत्यू’
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.