Home Breaking News त्या.. अपघातातील जखमी युवकाचा ‘मृत्यू’

त्या.. अपघातातील जखमी युवकाचा ‘मृत्यू’

2248

होतकरू तरुणाच्या मृत्यूने हळहळ

वणी :- आपले काम आटोपून 35 वर्षीय युवक गावाकडे दुचाकीने जात होतो. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रक ने धडक दिली. या अपघातात युवक गंभीर जखमी झाला होता. चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

किशोर महादेव झाडे(35) असे मृत युवकाचे नाव असून तो पेटूर येथे वास्तव्यास होता. निलजई कोळसा खाणीत तो कार्यरत होता. मंगळवारी सुट्टी असल्याने तो गावावरून कामानिमित्याने दुचाकी क्र (MH 29 BK 6649) ने वणी येथे आला होता.

वणी वरून पेटुर आपल्या गावी जात असतांना दि 15 मार्चला दुपारी 12 वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात किशोर गंभीर जखमी झाला होता. अपघात होताच घटनास्थळा वरून ट्रक पसार झाला.

जखमी किशोरला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान काल रात्री त्याचा मृत्यू झाला. किशोर अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा होता. होतकरू तरुणाच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. बुधवार दि. 16 ला दुपारी पेटूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
वणी: बातमीदार