Home Breaking News वणी – नांदेपेरा रस्ता की मृत्यू चा सापळा..!

वणी – नांदेपेरा रस्ता की मृत्यू चा सापळा..!

571

अवजड वाहनाची रेलचेल, रस्त्याची दुरावस्था

गणेश रांगणकर: वणी ते नांदेपेरा हा रस्ता दहा किमी अंतराचा आहे. हाच रस्ता पुढे नागपूर- हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. या मार्गावर पडलेले खड्डे भयावह आहे, वाहनचालकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागते. परिणामी लहानसहान अपघात नित्याचे झाले आहे. सातत्याने होणारी अवजड वाहनांची रेलचेल रस्त्याला मृत्यूचा सापळा बनविण्यासाठी कारणीभूत ठरतआहे.

वणी- नांदेपेरा मार्गावरून अवजड वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ आहे. रेती, कोळसा भरलेली अवजड वाहनेच खऱ्या अर्थाने रस्त्याच्या दुर्दशेला कारणीभूत ठरताहेत. या रस्त्यावरून अवजड वाहनांना वाहतूक करण्यास मनाई असल्याचे बोलल्या जात असून त्यावर प्रतिबंध का लावल्याजात नाही हे कोडे संशोधनाचा विषय आहे.

या मार्गाने एकोना, पांझुरणी या वेकोलि खदान मधील कोळसा वणी कडे येतो आहे. जेंव्हा की वरोरा -वणी हे अंतर कमी असताना कोसारा मार्गे खैरी, मार्डी, नांदेपेरा, वणी या मार्गाने कोळसा भरलेले अवजड ट्रक या मार्गाची निवड का म्हणून करतात हे न उलगडणारे कोडे आहे.

वणी- नांदेपेरा मार्गाच्या दुरावस्थेला प्रामुख्याने जबाबदार असणाऱ्या अवजड वाहनावर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रथमतः कारवाई करावी. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
वणी: बातमीदार