● आरोपी पसार, पोलिसात गुन्हा नोंद
मारेगाव: तालुक्यातील तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव) येथे वास्तव्यास असलेली पंधरावर्षीय बालिका मैत्रिणीच्या घरी जेवायला गेली होती. तेथे उपस्थित 24 वर्षीय तरुणाने एकांताचा फायदा घेत अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना दि. 27 मार्चला घडली याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी पसार झाला आहे.
अक्षय रवींद्र गोलर (24) असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी दुपारी अडीच वाजता ‘ती’ बालिका मैत्रिणीच्या घरी जेवायला गेली होती. जेवण आटोपून ती स्वयंपाक घरात गेली असता तेथे उपस्थित अक्षय हा तिच्या मागे घरात गेला व ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे म्हणत लगट करायला लागला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बालिका प्रचंड घाबरली. तिने प्रतिकार केला मात्र हा प्रकार बाहेर सांगितल्यास पाहून घेईल अशी धमकी त्याने बलिकेला दिली. घाबरलेल्या पीडितेने घरी जाताच घडलेली घटना आई ला सांगितली. याबाबत बलिकेच्या आईने आरोपी अक्षयला विचारणा केली असता त्याने पीडितेच्या आईलाही धमकावले.

पीडित बालिकेचे कुटुंब दहशतीत वावरत होते. अखेर घटनेच्या तीन दिवसांनंतर 30 मार्चला मारेगाव पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी भादंवि 354, 354 अ, 506 व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला असून पोलीस शोध घेत आहे.
मारेगाव: बातमीदार