● उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांची ग्वाही
वणी : कोरोना काळात सतत दोन वर्षे श्रीराम नवमी निमित्त आयोजित करण्यात येणारा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत होता. परंतु यावर्षी कोरोनाचे सर्व नियम शिथिल करण्यात आल्याने यावर्षी ऐतिहासिक व भक्तीमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची ग्वाही प्रभु श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी दिली.
मंगळवारी सायंकाळी सात वाजता येथील नगर वाचनालयात श्रीराम जन्मोत्सव शोभा यात्रेचे नियोजन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्व धर्मप्रेमी बांधवांच्या बैठकीत बेलूरकर बोलत होते. विशेष म्हणजे या बैठकीत सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व हिंदू धर्म प्रेमी उपस्थित होते.
आयोजित बैठकीचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प.मुन्ना महाराज तुगनायक होते. तर उपस्थितीतांमध्ये प्रशांत भालेराव, दिपक नवले, राजु उंबरकर, विनय कोंडावार, राजभाऊ पाथ्रडकर, विजय चोरडिया, प्रा. महादेव खाडे, ओम ठाकुर, गणपत लेडांगे, आशिष कुळसंगे, संजय पिंपळशेंडे, राकेश खुराणा, राजाभाऊ बिलोरीया, श्रीकांत पोटदुखे, उदय जोबनपुत्रा, नितिन शिरभाते, शंकर घुग्गरे, प्रमोद इंगोले, चंद्रकांत फेरवानी, अमित उपाध्ये, श्रीकांत पोटदुखे, बंटी ठाकुर, निशिकांत नक्षिणे, संतोष डंभारे, राकेश बुग्गेवार, मनोज सारमोकदम, जेष्ठ पत्रकार गजानन कासावार यांचेसह सर्व धर्मप्रेमी हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वणी: बातमीदार