Home Breaking News काँग्रेसच्या वतीने ‘बाबासाहेबांना’ अभिवादन

काँग्रेसच्या वतीने ‘बाबासाहेबांना’ अभिवादन

105

वणी: संपूर्ण जगात महामानव, क्रांतीसुर्य, विश्वनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात येते. वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटीतर्फे महामानवाच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सामाजिक न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता प्रबांधित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार संविधानाच्या माध्यमातून देशाला दिला. त्यांची जयंती देशातील प्रत्येक नागरिक उत्साहात साजरी करतात.

याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद नीकूरे, जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख, ओम ठाकूर, राजाभाऊ पाथ्रडकर, शहर सेवादल अध्यक्ष प्रमोद लोणारे, उत्तम गेडाम, सलीम खान, महादेव दोडके, वामन कुचनकर, संध्या रामगिरवार, विजया आगबत्तलवार, सविता ठेपाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार