Home Breaking News त्याने…गळफास लावून संपवली जीवनयात्रा

त्याने…गळफास लावून संपवली जीवनयात्रा

1254

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खांदला येथे वास्तव्यास असलेल्या 38 वर्षीय इसमाने आपल्या घरीच गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अजय शिवराम बलकी(38) असे मृतकाचे नाव आहे. तो मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता त्यातच त्याला डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला तसेच 50 हजार रुपये खर्च येईल असे सांगितले यामुळे तो हवालदिल झाला होता. वैफल्यग्रस्त अवस्थेत सोमवारी मध्यरात्री नंतर त्याने लगतच असलेल्या पडक्या घरात कापडी दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.

सकाळी घरच्या मंडळींना ही बाब कळताच एकच हंबरडा फोडला. या बाबत अशोक बलकी यांनी शिरपूर पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. त्याचे पश्चात वडील, पत्नी, दोन मुलें, आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिवारावर शोककळा पसरली आहे.
वणी: बातमीदार