Home Breaking News बापरे….तब्बल 904 बोगस मतदार…!

बापरे….तब्बल 904 बोगस मतदार…!

627

निवडणूक विभाग निद्रिस्त
ग्रामपंचायत सदस्य आंदोलनाच्या पवित्र्यात

वणी: तालुक्यातील भालर लाठी ग्रामपंचायत मधील मतदार यादीत प्रचंड घोळ निर्माण झाला आहे. तब्बल 904 मतदार हे स्थलांतरित व मृतपावले आहे. त्या सर्वांची नावे मतदार यादीतून कमी करण्याची जबाबदारी निवडणूक विभागाची असताना संबंधित विभाग निद्रिस्तावस्थेत असल्याने ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी 5 ते 6 महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीला पत्र पाठवून मतदार यादीतील दुरुस्ती, नाव वगळणी तसेच नाव नोंदणी इत्यादी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचवावी याकरिता आदेशीत केले होते. त्यानुसार ग्रामपंचायत लाठी भालर वसाहतला ग्रामसभेचे आयोजन केले होते.

याप्रसंगी ग्रामपंचायत लाठी-भालर वसाहत ला मतदार यादीचे वाचन करण्यात आले. या मतदार यादीमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील मतदार यादी भाग क्र.189 मध्ये 521 मतदार, भाग क्र.190 मध्ये 185 मतदार, भाग क्र 191 मध्ये 186 मतदार व भाग क्र 227 मध्ये 12 असे एकूण 904 मतदार हे स्थलांतरित व मृतपावले असल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे या सर्व मतदारांची नावे कमी करण्याबाबत पत्र तथा ग्रामपंचायतीचा ठराव निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात आला होता.

ग्रामपंचायत हद्दीतील अनेक नागरिक हे मृत पावलेले आहेत. काही लोक हे कायमचे स्थलांतरित झाले आहे. काही लोकांची नावे ही एकापेक्षा जास्त वेळ आली आहे. हा घोळ संपुष्टात आणण्याची जबाबदारी निवडणूक विभागाची आहे.

याबाबत ग्रामपंचायत लाठी भालर वसाहत करिता नियुक्त असलेल्या BLO यांना विस्तृत माहिती देण्यात आलेली असताना अद्याप ती बोगस नावे कमी करण्यात आली नाही. निवडणूक विभागाच्या या लोकशाहीला मारक कारभारा विरोधात ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वणी: बातमीदार

Previous articleअखेर त्या….माकडाला पकडण्यात वन विभागाला यश
Next articleशेतकऱ्यांना वेठीस धरले तर ‘खळखट्याक’, प्रशासनाला ‘अल्टीमेटम’
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.