Home Breaking News दुःखद…भाजयुमो शहर उपाध्यक्षाचा ‘अपघाती मृत्यू’

दुःखद…भाजयुमो शहर उपाध्यक्षाचा ‘अपघाती मृत्यू’

2693

भरधाव ट्रक ची दुचाकीला धडक

वणी: परिसरातील वाहतूक व्यवस्था कमालीची ढेपाळली आहे. अस्ताव्यस्त वाहतूक अपघाताला कारणीभूत ठरत आहे. बुधवार दि. 8 जूनला रात्री 9 वाजताच्या सुमारास लालपुलिया परिसरात भरधाव ट्रक ने दुचाकीला धडक दिली. यात 29 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक भारतीय जनता युवा मोर्चा चा शहर उपाध्यक्ष होता.

अभिजित राऊत (29) असे मृतकाचे नाव आहे. तो नगर परिषद शाळा क्रमांक 7 जवळ राहतो. त्याचे आंबेडकर चौकात ऑटोमोबाईल चे दुकान आहे. व्यवसायातील रकमेच्या वसुली करिता तो लाल पुलिया परिसरात रात्री 9 वाजताच्या सुमारास गेला होता.

वसुली निमित्ताने लालपुलिया परिसरात दुचाकीने जात असताना भरधाव ट्रक ने धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तातडीने उपचारार्थ चंद्रपूर ला हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुण व्यावसायिक व उमदा राजकारणी नियतीने हिरावल्याने शोककळा पसरली आहे.
वणी: बातमीदार