● संस्कृत संभाषण शिबिराचे उद्घाटन संपन्न
वणी: संस्कृत भाषेच्या विविधांगी प्रचाराद्वारे जनमानसात संस्कृत प्रेम जागृत करण्यासाठी वणी नगरात संस्कृत भारती, नगर वाचनालय आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.
आयोजित संस्कृत संभाषण शिबिराचे उद्घाटन, संस्कृत भारती प्रान्त शिक्षा विभाग प्रमुख प्रणीता भाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी व्यासपीठावर संस्कृत भारती वणी नगर अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड उपस्थित होते.
नैरोबी (केनिया) येथील निवासी मूळ वणीकर असणाऱ्या आभा अभिजित पाठक या वर्गात मार्गदर्शन करीत आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आगामी दहा दिवसात या नि:शुल्क शिबिरात आवश्यक संस्कृत संभाषणासह अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळणार आहेत.
शिबिराच्या यशस्वितेसाठी नगर उपाध्यक्ष प्रशांत भाकरे, वृशाली देशपांडे, रेणुका अणे, गायत्री महालक्ष्मे, कोमल बोबडे आदी संस्कृत भारती कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. वणीकर संस्कृत प्रेमींनी दि. 23 जून पर्यंत रोज 3:30 ते 5 या वेळेत नगर वाचनालयाच्या सभागृहात होणाऱ्या या शिबिराचा बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन नगरमंत्री महेश पुंड यांनी केले आहे.
वणी: बातमीदार