Home Breaking News परीक्षा झाल्या विद्यार्थींच्याच ‘शाळेत’, शेकडो आले गुणवत्तेच्या ‘माळेत’

परीक्षा झाल्या विद्यार्थींच्याच ‘शाळेत’, शेकडो आले गुणवत्तेच्या ‘माळेत’

9754

तालुक्‍यातुन अंजली बल्‍की अव्‍वल
43 पैकी 15 शाळेचा निकाल 100 टक्‍के
तालुक्‍याचा निकाल 92-61

वणी: महाराष्‍ट राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च शिक्षण मंडळाद्वारे मार्च 2022 मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या दहावी परिक्षेचा ऑन लाईन निकाल मंडळाने आज जाहिर केला आहे. यात जनता विदयालयाची अंजली वामन बल्‍की हिने 94.80 टक्‍के गुण प्राप्‍त करून तालुक्‍यातुन प्रथम येण्‍याचा मान मिळवला आहे.

जनता शाळेच्याच मयूर अनिल वाढई 94.60 टक्‍के घेवून दुसरा आला आहे. वणी तालुक्‍यातील 43 शाळांपैकी 15 शाळांचा निकाल 100 टक्‍के लागला. तालूक्‍यातुन 2356 विदयार्थ्‍यांनी परिक्षा दिली त्‍यापैकी 2182 विदयार्थी उत्‍तीर्ण झाले. तालुक्‍याचा निकाल 92. 61 टक्‍के लागला आहे.

यावर्षी ऐन परिक्षेच्‍या काळात कोवीड चा प्रादुर्भाव वाढला होता. त्‍यामुळे खबरदारी म्‍हणुन मंडळाने विदयार्थी शिकत असलेल्‍या शाळेतच त्‍यांची परिक्षा घेतली. परिणामी दोन चार अपवाद वगळता सर्वच शाळांचा निकाल 90 टक्‍क्‍यापेक्षा अधिक लागला. तर 15 शाळांचा निकाल शतप्रतशित लागला.

जिल्‍हा परिषद शाळा वणी, नवभारत हायस्‍कूल उकणी, लॉयान्‍स इंग्‍लीश मिडीयम स्‍कूल वणी, नुसाबाई चोपने विदयालय वणी, आदर्श हायस्‍कुल साखरा दरा, तुकडोजी महाराज विद्यालय भालर, ग्रामिण विकास विद्यालय ब्राम्‍हणी, स्‍व. विठठल पा. मांडवकर विद्यालय तेजापुर, सरस्‍वती माध्‍यमीक विदयालय मोहर्ली, वणी पब्‍लीक स्‍कुल, साईक्रपा विद्यालय मुर्धोणी, शासकीय निवासी शाळा परसोडा, संताजी इंग्‍लीश मिडीयम स्‍कुल वणी, न्‍यू व्हिजन इंग्‍लीश मिडीयम स्‍कुल वणी, ग्रामिण विद्यालय परमडोह या शाळेंचा समावेश आहे.

शाळेतच परिक्षा झाल्‍याने तालुक्‍यातील तब्‍बल 571 विदयार्थी प्राविण्‍य श्रेणीत झळकले आहे. तर पास श्रेणीत केवळ 143 विदयार्थी उत्‍तीर्ण झाले आहे.
वणी: बातमीदार