● त्रिशय आसुटकर अव्वल, 83 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत
वणी: माध्यमिक शालांत परिक्षाचा निकाल शुक्रवारला जाहीर झाला. यात लॉयन्स इंग्लीश मिडीयम शाळेने आपली गुणवत्ता व यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेचा निकाल शत प्रतिशत लागला असून तब्बल 83 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आले आहेत.
लॉयन्स इंग्लीश मिडीयम चा त्रिशय मधुसुदन आसुटकर याने 94 टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकविला आहे. तसेच श्रावणी दिलीप उरकुंडे हिला 93 टक्के, तुलसी सुभाष खुजे 91 टक्के, अथर्व पंजाब बेलुरकर 90.20 टक्के व अनुभव अनिल गाडगे 90 टक्के गुण प्राप्त केले आहे.
लॉयन्स इंग्लीश मिडीयम शाळेच्या 151 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली त्यात 83 विद्यार्थी प्राविण्य यादीत आले आहेत तर 52 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले असून 15 विद्यार्थी व्दितिय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेचे अध्यक्ष शमीम अहमद, उपाध्यक्ष डॉ के. आर. लाल, सचिव महेन्द्र श्रीवास्तव, संचालक रमेश बोहरा, डॉ. रविकांत देशपांडे, सुधिर दामले, चंद्रकांत जोबनपुत्रा, बलदेव खुंगर, ललीता बोदकुरवार शाळेचे प्राचार्य प्रशांत गोडे, लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी व सदस्यांनी आणि सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
वणी: बातमीदार