Home Breaking News ‘परिवर्तन’ पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

‘परिवर्तन’ पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

449

निवडणूक रणधुमाळी उत्कंठावर्धक

वणी: श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 17 संचालक निवडीसाठी 26 जूनला मतदान होणार आहे. परिवर्तन घडविण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली असून निवडणूक रणधुमाळी उत्कंठावर्धक स्थितीत आहे. सोमवार दि. 20 जूनला पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन येथील आबड भवनमध्ये डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

आबड भवनमध्ये सुरु करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी वणी शहर काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परिवर्तन पॅनलला माजी आमदार वामनराव कासावार यांचा पाठिंबा आहे. संस्थेवर परिवर्तन पॅनलचे संचालक निवडून आणण्यासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व काँग्रेस कार्यकर्ता उमेदवारासोबत प्रचारार्थ उतरले आहे.

मतदानाला अवघे 5 दिवस उरलेले असताना परिवर्तन पॅनलने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. पतसंस्थेच्या 15 शाखा मधील शेकडो अभिकर्ता परिवर्तनच्या दिशेने सक्रिय झाले आहेत. संस्थेच्या प्रगतीत दैनिक वसुली अभिकर्त्याचा मोठा वाटा असतो. सभासदासोबत असणारे त्यांचे ऋणानुबंध, परिवर्तन घडविण्यासाठी कारणीभूत ठरणार का हे निवडणुकीअंती स्पष्ट होणार आहे.

परिवर्तन पॅनेलच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. महेंद्र लोढा, प्रमोद वासेकर, प्रमोद निकुरे, राजाभाऊ बिलोरिया, संजय खाडे, जयकुमार आबड, वंदना आवारी, संध्या बोबडे, सविता ठेपाले, मंगला झिलपे, मंदा बांगरे, विजया आगबतल्लवार, सुरेखा वडीचार, ललिता बाशेटीवर, माया कोरडे व परिवर्तन पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.
वणी: बातमीदार

Previous articleवर्धा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
Next articleतब्बल… 15 वर्षानंतर मिळाले ‘गटशिक्षणाधिकारी’
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.