Home Breaking News माजी पंस सभापती अभय सोमलकर याचे निधन

माजी पंस सभापती अभय सोमलकर याचे निधन

2480

सच्चा शिवसैनिक हरपला

वणी :- वणी पंचायत समितीचे माजी सभापती बाळू उर्फ अभय सोमलकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते मागील काही काळापासून आजारी होते. त्यांचेवर नागपूर येथे उपचार सुरू असताना शुक्रवार दि.24 जूनला मध्यरात्री प्राणज्योत मालवली.

बाळू सोमलकर (48) यांचे मुळगाव सावरला हे होते मात्र ते वणीतच स्थायिक झाले होते. ते जेष्ठ शिवसैनिक होते तसेच त्यांनी वणी पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले आहे. सावरला गणातून ते निवडून यायचे.

बाळू सोमलकर मास लीडर म्हणून परिसरात परिचित होते. होते.शिवसेना पक्षाने त्यांना पंचायत समिती सभापतीची जबाबदारी दिली होती.ती त्यांनी यशस्वीरित्या पारपाडली होती.

सोमलकर यांच्यातील संघटन कौशल्य वाखाणण्यासारखे होते. तडफदार स्वभावाचे असल्याने त्यांनी राजकारणात चांगलीच भरारी घेतली होती. त्यांनी आपल्या पत्नीला देखील निवडून आणत पंचायत समितीत सभापती केले होते.

मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दि 24 जून ला रात्री नागपूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
वणी: बातमीदार

(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Previous articleत्या..व्हायरल मॅसेज ने उडाली ‘तारांबळ’
Next articleजय सहकार ची विजयाकडे घोडदौड
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.