Home Breaking News रंगनाथ चे ऍड. काळे यांचा सत्कार

रंगनाथ चे ऍड. काळे यांचा सत्कार

42

वणी : विदर्भातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था म्हणुन नावारूपास आलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत अॅड. देविदास काळे यांच्या गटाने एकहाती सत्ता स्थापन केली. या निमीत्ताने दैनिक अभिकर्ता असोसिएशन च्या वतीने पुष्पगुच्छ देउन अॅड. काळे यांचा सत्कार करण्यात आला.

वणी येथे रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे मुख्य कार्यालय आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल 800 कोटीच्या जवळपास असुन 42 हजार सभासद आहे. संस्थेच्या 14 शाखा यवतमाळ, चंद्रुपर, नागपुर, वर्धा येथे कार्यरत आहे. तर 8 शाखा प्रस्तावित आहे.

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे मागील विस वर्षांपासून अॅड. देविदास काळे हे अध्यक्षपदी कायम आहे. एका लहानशा कक्षातील कार्यालयातुन सुरू झालेली घौडदौड विशाल वटवृक्षात करण्यासाठी अॅड. काळे आणि संचालक मंडळानी कठोर परीश्रम घेतले आहे.

रंगनाथ स्वामीच्या कार्यरत 14 शाखेतील शेकडो दैनिक अभिकर्त्यांनी स्वताच्या न्याय हक्काकरीता अभिकर्ता असोसिएशन ही संघटना स्थापन केली आहे. या संघटनेतील कार्यकारणीमध्ये 11 सदस्य असुन 150 सभासद पतसंस्थेच्या उन्नतीकरीता प्रयत्नरत आहे.

अभिकर्ताअसोसिएशन चे अध्यक्ष सागर बोढे, सचिव अविनाश कडु व उपाध्यक्ष तेजराज ठाकरे यांनी नवनिर्वाचीत संभाव्य अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांना पुष्पगुच्छ देउन पुढील उन्नतीशील कारभाराकरीता शुभेच्छा दिल्या आहे.
वणी: बातमीदार

Previous articleअबब….शिरपूर- शिंदोला मार्गावर साचले ‘तळे’
Next articleमहिलेला मारहाण, आरोपीला दोन वर्षांची ‘शिक्षा’
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.