● बचाव पथकाची स्तुत्य कारवाई
वणी: तालुक्यात धुवांधार पाऊस कोसळत आहे. नदी, नाले दुथडीभरून वाहताहेत. नदीकाठावरील गावे प्रभावित झाली आहे. तालुक्यातील सावंगी येथे निर्गुडेने धारण केलेले रौद्ररूप आणि गावात साचलेले पाणी यामुळे गावाचा तुटलेले संपर्क लक्षात घेता बचाव पथकाने गावातील गर्भवती महिलेसह नऊ लोकांची सुरक्षितस्थळी रवानगी केली आहे.
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे तालुक्यात नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील जुगाद, साखरा, सावंगी, घोंसा, कवडसी, दहेगाव, चिंचोली या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन सावंगी आणि जुन्या सावंगी यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक वॉटर असल्यामुळे दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे.
नवीन सावंगी मध्ये सुमारे हजार लोकवस्ती असून शोध व बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. आज येथील 9 लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. यामध्ये एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिले सोबत 3 मुलांचा व मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.

सावंगी या गावातील पुरात फसलेल्या नागरिकांना बचाव पथकाने तातडीने सुरक्षितस्थळी रवाना केले. या व्यक्तींमध्ये रामचंद्र वाघमारे, शांता रामचंद्र वाघमारे, बंडू रामचंद्र वाघमारे, विजू खिरटकर, वेदांत विजू खिरटकर, मनीष विजू खिरटकर, प्रदीप आसुटकर, निराक्रश प्रदीप आसुटकर, तसेच गर्भवती महिलेचा समावेश आहे.
नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्य वतीने तसेच जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच पुराच्या पाण्यात किंवा पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
उप विभागात कोणतीही अनुचित प्रकार घडूनये याकरिता उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निखिल धुळधर, महसूल, पोलीस व नगर परिषद विभागाची चमु, पोलीस कॉन्स्टेबल पुकार वाकोडे, अमर भवरे, सागर केराम, सुभान अली, तसेच आपत्ती निवारण पथकातील अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.
वणी: बातमीदार
ही बातमी सुध्दा वाचा-