Home Breaking News राजकीय पुढारी गेले पाहून, ‘उंबरकर’ आलेत धावून..!

राजकीय पुढारी गेले पाहून, ‘उंबरकर’ आलेत धावून..!

750

बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याने शेती खरडली

वणी: उप विभागात पावसाने हाहाकार माजवला होता. संततधार पाऊस आणि सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती आणि बेंबळा प्रकल्पाच्या कालव्यातून पाण्याचा होणारा निचरा यामुळे मारेगाव तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन चक्क खरडून गेली. दुबार पेरणी चे संकट उभे असताना राजकीय पुढारी शासनाच्या भरवशावर सोडून गेले तर राजू उंबरकर मात्र शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र बघायला मिळाले.

राज्यात पावसाने मागील चौदा दिवसापासून चांगलीच हजेरी लावली आहे. दमदार, मुसळधार, कोसळधार, ढगफुटी अशा उपमा लावण्यात येत आहे. परंतु पावसाचा आक्रस्थाळेपणा बळीराजाला नागवणारा ठरला आहे. नदी- नाल्या दुथडीभरून वाहताहेत, उपविभागतील हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे.

मारेगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे काम सुरू आहे. कालव्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने चॅनल गेट बंद ठेवले होते. पावसाचा संततधार भडिमार सुरू असल्याने लगतचा बांध फुटला आणि शेकडो हेक्टर शेती खरडून निघाली. पिके पुर्णतः नष्ट झाली, शेतकरी दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर आला. प्रशासनाच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना बसला.

मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा, चोपन, मार्डी, बामर्डा, गोरज येथील शेतकऱ्यांना मानवनिर्मित सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. राजकीय पुढाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांच्या भेटी- गाठी घेतल्या. मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने त्या पीडित शेतकऱ्यांनी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना बोलावले. उंबरकरांनी मात्र अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल जाब विचारला.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी बेंबळा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत ‘पंचनामा नंतर करा व पाहिले मदत करा’ मागणी केली. बेंबळा प्रकल्पाच्या वतीने पीडित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन घेतले व शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी मनसे प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, तालुका उपाध्यक्ष वामन चटकी, वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार व वणी शहर अध्यक्ष शिवराज पेजे, अजित शेख, विलन बोदाडकर, सरपंच शुभम भोयर, रोशन शिंदे, संकेत पारखी, लोकेश लडके, रुचीर वैद्य यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्या शेतकऱ्याला घेतले दत्तक
हिवरा मजरा येथील राकेश नामदेव धानोरकर या शेतकऱ्याची दोन एकर शेती पूर्णतः खरडून गेली. त्या गरीब शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला असताना उंबरकर यांनी शेतीची व उपजीविकेची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच देविदास बुटे, पांडुरंग धानोरकर, प्रशांत बुटे, गजानन पिंपळशेंडे, बालाजी देवतळे , चंपट डोंगे, गजानन काळे, आनंदराव सोयाम, विद्या बुद्धाने, रामाजी मालेकर यांना सुध्दा तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार

ही बातमी सुध्दा वाचा

मनसेची मागणी सफल, शाळा दोन दिवस बंद