Home Breaking News पूर पीडितांच्या मदतीसाठी ‘चोरडिया’ सरसावले

पूर पीडितांच्या मदतीसाठी ‘चोरडिया’ सरसावले

472

मूलभूत गरजांची पूर्तता आणि निवासाची व्यवस्था

वणी: उप विभागात पावसाने हाहाःकार माजवला आहे. अनेक गावांना पुराचा वेढा पडलेला आहे. शेकडो नागरिकांचे स्थलांतर आपत्ती व्यवस्थापन समिती करताहेत. मात्र पुरपीडित नागरिकांना खरा आधार देण्याच्या दृष्टिकोनातून मूलभूत गरजांची पूर्तता आणि निवासाची व्यवस्था करण्यासाठी विजयबाबू चोरडिया सरसावले आहेत.

तालुक्यातील तब्बल 14 गावे पूर बाधित क्षेत्रात येतात, अनेक गावाला पुराच्या पाण्याने कवेत घेतले आहे. नदीकाठावरील गावांना चांगलाच फटका बसला आहे. अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन समिती, शोध बचाव पथक, SDRF चे पथक पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करताहेत.

नैसर्गिक आपत्ती ने बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया, उमेश पोद्दार आणि मित्रमंडळ सरसावले आहेत. अडचणीत सापडलेल्या लोकांना राहण्याची, जेवणाची व आरोग्यविषयक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनच्या पथकांतील 130 जवानांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था श्री विनायक मंगल कार्यालयात करण्यात आली आहे.

     

     ● जिल्हाधिकारी यांच्यासोबत साधला संवाद ●           उप विभागात ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे मंगळवारी वणीत आले होते याप्रसंगी विजयबाबू चोरडिया यांनी संवाद साधला. पुरपीडितांना कोणतीही मदत लागल्यास आम्ही व मित्र परिवार सज्ज आहोत. सर्वच मूलभूत गरजांची पूर्तता व निवासाची व्यवस्था करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले.

पुरबाधित नागरिकांना आवाहन
स्थलांतरित तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांनी निःसंकोचपणे मदत लागल्यास खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तात्काळ मदतीचा हात पुढे करण्यात येईल असे आवाहन विजयबाबु चोरडिया व उमेश पोद्दार मित्र परिवार यांनी केले आहे.
9422950000 / 9922778814
वणी: बातमीदार

Previous articleजिल्ह्यातील Crime update | आत्महत्या, गुन्हेगारी, अपघात, मारहाण आणि …..
Next articleहंबरडा फोडणारे जनावर चारा बघून ‘हरखले’
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.