Home Breaking News Crime update | नोकरी लावण्याचे आमिष, फसवणुकीचा गुन्हा नोंद

Crime update | नोकरी लावण्याचे आमिष, फसवणुकीचा गुन्हा नोंद

622

यवतमाळ | आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उजागर झाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रशेखर दादाराव मडावी (50) रा. मादनी, वासुदेव शंकर वाघ (60), प्रभाकर महादेव मानकर (45) हे दोघेही रा. परशुराम मंदिरजवळ जाम रोड यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. मादनी येथील मदनेश्वर प्राथमिक, माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत नोकरीवर लावून देण्याचे आमिष देत आठ लाखांची मागणी केली होती.

भाऊराव दौलतराव मसराम (58) रा. जगत मंदिर परिसर उमरसरा यांच्या मुलाला आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून घेण्याचे आमिष या तिघांनी दिले होते. मसराम यांनी तीन लाख रुपये रोख दिले. उर्वरित पाच लाख पगारातून कपात करण्याचे ठरले होते. तसेच रुजू करून घेतले मात्र 30 एप्रिल ला त्याला कामावरून काढून टाकले. यामुळे व्यथित झालेल्या पिता- पुत्राने दिलेले पैसे परत मागितले मात्र होत असलेली टाळाटाळ यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. याबाबत पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा तिघांवर नोंद केला आहे.
बातमीदार