Home Breaking News नंदीग्राम एक्सप्रेस पूर्वरत सुरू करा…!

नंदीग्राम एक्सप्रेस पूर्वरत सुरू करा…!

718

आमदार बोदकुरवार यांची मागणी
रेल्वे मंत्र्यांना निवेदन

वणी :- मागील 10 वर्षांपासून सुरू असलेली नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस कोविड चे कारण पुढे करून बंद करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस पूर्वरत सुरू करण्याची मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी रावसाहेब दानवे केंदीय रेल्वे राज्यमंत्री, यांचे कडे निवेदनातून केली आहे.

वणी शहरात ब्रिटिश काळा पासून रेल्वे चे जाळे आहे. परिसरात असलेल्या कोळसा खाणीतील कोळसा रेल्वेने देशभरात पोहचविला जातो. तसेच वणी परिसर औद्योगिक दृष्टीने महत्वाचा असल्याने नागपूर व मुंबईला येथील नागरिकांचे जाणे येणे असते.

विद्यार्थ्यांना अतिशय सुलभ व सोयीची असलेली नंदीग्राम एक्सप्रेस केवळ नांदेड पर्यंतच सुरू आहे. नांदेड ते नागपूर व्हाया वणी सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. या भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना नांदेड, औरंगाबाद ला सतत जावे लागते. अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या शिकवण्या नांदेड, औरंगाबाद ला लावलेल्या आहे.

अनेक वर्षांच्या मागणी नंतर वणी येथील मुंबई जाण्यासाठी नंदीग्राम एक्सप्रेस 10 वर्षापूर्वी सुरू करण्यात आली होती. या गाडीला प्रवाशी देखील मिळत होते. मात्र कोरोना काळात सर्व जग थांबले होते, त्यावेळी ही गाडी बंद करण्यात आली. पुन्हा ती रेल्वे तातडीने सुरू करावी अशी मागणी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.
वणी: बातमीदार