● पक्षाला मिळणार बळकटी
वणीः वणी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाची पुर्नबांधणी करण्यासाठी वरिष्ठ नेते कसोशीने प्रयत्न करताहेत. पक्षस्थापने पासुन पक्षात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. येथील विजय नगराळे यांची जिल्हा सरचिटणीस पदावर निवड करण्यात आल्याने कार्यकर्त्यांत नवी उमेद निर्माण होत आहे.
वणी विधानसभा क्षेञात राष्ट्रवादी पक्षाची मोठी वाताहत झाली आहे. या पक्षातील पुर्वाश्रमीच्या नेत्यांनी मोठमोठी पदे भुषवली आहेत. परंतु पक्ष स्थापने पासून एकनिष्ठ असलेल्यांना सातत्याने सापत्न वागणूक मिळत होती. त्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी करीता पक्षनेतृत्व संधी देतांना दिसत आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेवरून जिल्हा अध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांनी विजय नगराळे यांची जिल्हा सरचिटणीस पदावर निवड केली आहे. विजय नगराळे हे आर.आर.पाटील (आबा) यांच्या झंझावाती नेतृत्वाने प्रभावित झाले होते. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कायर्रत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली.

शरदचंद्रजी पवार यांच्या विचारातून पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनहितार्थ कार्य करण्यात येईल. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे स्पष्ट करत पक्ष संघटना मजबुतीने उभी करू असे मत विजय नगराळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष सूर्यकांत खाडे उपस्थित होते.
वणी: बातमीदार