Home Breaking News आजी- आजोबा समोरच नातीचा विनयभंग

आजी- आजोबा समोरच नातीचा विनयभंग

2899

घरात घुसून आरोपीची दादागिरी
गुन्हा नोंद, आरोपी अटकेत

वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वेळाबाई येथे 17 वर्षीय बलिकेचा विनयभंग करण्यात आला. तसेच अटकाव करणाऱ्या तिच्या आजी व आजोबाला मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवार दि. 25 ऑगस्ट ला दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महेश मारोती चवले (24) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे, तो वेळाबाई येथील निवासी आहे. तो बऱ्याच दिवसापासुन बालिकेवर वाईट नजर ठेवुन होता. ती जिथे जाईल तीथे तिचा पाठलाग करत होता.

घटनेच्या दिवशी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घरात कोणीच नसल्याची संधी शोधून तो घरात घुसला. अचानक तिला कवेत घेत “मी तुझ्यावर प्रेम करतो” असा बोलला. परंतु घरात आजी व आजोबा होते, त्यांनी त्याला चांगलेच खडसावले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे ती बालिका प्रचंड घाबरली.

आरोपीने आजीचा हात मुरगळला व आजोबाला धक्का बुक्की केली. घडलेल्या प्रकाराने संपूर्ण कुटुंब दहशतीत आले. त्यांनी थेट शिरपूर पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली. ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनेचे गांभीर्य बघून आरोपीला तातडीने ताब्यात घेतले. या प्रकरणी महेश चवले याचेवर विविध कलमा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
वणी: बातमीदार