Home Breaking News बहिणीकडे आला आणि गळफास घेतला

बहिणीकडे आला आणि गळफास घेतला

1610

वेळाबाई येथील घटना

वणी :- शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वेळाबाई या गावात बहिणीच्या गावाला आलेल्या भावाने गळफास घेतला. ही खळबळजनक घटना गुरुवार दि. 1 सप्टेंबर ला उघडकीस आली.

बादल त्र्यंबक मेश्राम (28) असे गळफास घेणाऱ्या युवकाचे नाव आहे. तो खापरी येथील रहिवासी असून तो गुरुवारी वेळाबाई येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या बहिणीकडे आला होता.

वेळाबाई येथे येताच त्याचे जावई संदीप मारोती परचाके यांनी त्याची विचारपूस केली. “कसे काय येणे झाले” अशी विचारणा केली असता सहज भेटीला आलो असे त्याने सांगितले. बहीण शेतात गेली होती यामुळे त्यांनी बादल ला जेवण करून घे असे सांगितले व कामा निमित्याने घुगूस ला निघून गेले.

सायंकाळी पारिवारिक मंडळी घरी आली असता बादल ने गळफास घेतलेला असल्याचे आढळुन आले. त्याने आत्महत्या का केली याची माहिती मिळु शकली नाही. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
वणी: बातमीदार

Previous articleनिशुल्क रोग निदान शिबीर आणि सामाजिक उपक्रमाची लयलूट
Next articleधडाका…..21 कोटी रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.