● चोरट्यासह भंगार व्यावसायिक अटकेत
● रेल्वे पोलिसांची वणीत कारवाई
वणी: आजवर आपण अनेक भंगार चोरीचे प्रकार बघितले आहे. मात्र चोरट्याने रेल्वे इंजिन वर असलेल्या ओव्हरहेड वायरचीच चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून बल्लारशाह रेल्वे पोलिसांनी वणी येथून एका चोरट्या सह भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेतले तर दोघे फरार झाले आहेत.
वणी परिसरासह लगतच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. तसेच परिसरात अनेक कोळसा खाणी व त्यावर आधारित विविध उद्योग आहेत. याठिकाणी भंगार चोरट्यानी आपली वक्रदृष्टी फिरवली आहे. पैशाच्या मोहामुळे अनेक बेरोजगार युवक भंगार चोरीत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अनेक लहानसहान भंगार चोरीच्या घटना नित्याचेच झाले आहे.
भंगार चोरट्यानी आता आपले लक्ष रेल्वेच्या मौल्यवान वस्तूवर केंद्रित केले आहे. रेल्वे इंजिन च्या वर तांब्या पासून तयार केलेले ओव्हरहेड (OHE) वायर असतात. चोरट्यानी तब्बल 40 मीटर ओव्हरहेड वायर चोरली.
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी राजूर येथील भंगार चोरटा आदित्य शर्मा (19) व भंगार व्यावसायिक शेख अहमद अब्दुल गफूर (65) यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेतील एक ऑटो चालक व अन्य एक असे दोघे पसार झाले आहेत. ही माहिती रेल्वे पोलिसांनी दिली असून भंगार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी: बातमीदार