Home Breaking News लोकांच्या दुःखावर फुंकर मारणारे ‘स्वामी’ सेवानिवृत्त

लोकांच्या दुःखावर फुंकर मारणारे ‘स्वामी’ सेवानिवृत्त

1075

पोलीस खात्यातील उज्वल कारकीर्द

वणी: पोलीस खात्यात कर्तव्य बजावताना जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा विरळाच. निष्ठा आणि खिलाडूवृत्ती, पोलीस दलात 38 वर्षाची उज्वल कारकीर्द, त्यातच आयुर्वेदाचे ज्ञान असल्याने लोकांच्या दुःखावर फुंकर मारणारे अशोक ‘स्वामी’ नुकतेच सेवानिवृत्त झालेत.

अशोक नारायण स्वामी उत्कृष्ट हॉकीपटू 23 वर्ष महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या राष्ट्रीय खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत पोलीस प्रशासनाचा मान उच्चस्तरावर नेऊन मानाचे मानकरी ठरलेत. त्यानी सन 1990 रोजी मुबंई येथील खालसा ग्राऊंडवर धनराज पिले याच्या संघात स्थान मिळवत टाटा संघासोबत झालेल्या लढतीत मोलाची कामगिरी बजावत विजयी सलामी दिली होती.

अशोक स्वामी हे यवतमाळ जिल्हा पोलीस दलात 13 जानेवारी 1984 ला रुजू झालेत. महागाव पोलीस स्टेशन येथे शिपाई पदी प्रथम रजू झाले आणि निरंतर कर्तव्य बजावत असतानाच 23 वर्ष हॉकी खेळाच्या माध्यमातून पोलीस दलात उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यानी पुसद, उमरखेड, यवतमाळ, यवतमाळ शहर, वणी व शिरपूर या ठिकाणी आपले कर्तव्य पूर्ण केले.

शिरपूर ला असताना पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी त्यांच्या कर्तव्याची जाण ठेऊन सहाय्यक फौंजदार पदावरून दि. 24 आगस्ट 2022 रोजी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती देण्यात आली. तर त्यांची दि.31 ऑगस्ट 2022 ला पोलीस दलातील उत्कृष्ट कारकीर्द संपुष्टात आली.

अशोक स्वामी पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना SDPO संजय पूजलवार, शिरपूरचे ठाणेदार API गजानन करेवाड याच्या उपस्थितीत मानसन्मानपूर्वक निवृत्ती निरोप देण्यात आला. कर्तव्याचे पालन पुढेही अविरतपणे सुरु राहील असे ते म्हणाले. आयुर्वेदाचे असलेले ज्ञान, विविध आजारावरील जडी बुटीचा वापर रुग्णसेवेसाठीच करून लोकांच्या दुःखावर फुंकर मारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वणी: बातमीदार