Home Breaking News थरारक….पुलाचे कठडे तोडून ट्रक नदीत कोसळला

थरारक….पुलाचे कठडे तोडून ट्रक नदीत कोसळला

3889

● वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडली घटना

वणी: मुकूटबन कडे जाणारा बारा चाकी ट्रक पुलाचे कठडे तोडून नदी पात्रात पडल्याची घटना बुधवारी रात्री 10 वाजताचे सुमारास घडली. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असून चालकाचा अद्याप पत्ता लागला नाही.

वणी वरून रात्री 10 वाजताचे सुमारास मुकुटबन मार्गाने ट्रक निघाला होता. याच मार्गावर निर्गुडा नदीवर मोठा पूल आहे, ट्रक पुलावर पोहचताच ट्रक चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाचे कठडे तोडून नदी पात्रात पडला.

याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले मात्र अंधार असल्याने ट्रक बाहेर काढता आला नाही. ट्रक चालक आत फसून आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
वणी: बातमीदार