Home Breaking News युवा शेतकऱ्याची आत्महत्या

युवा शेतकऱ्याची आत्महत्या

796

कोलार पिंपरी येथील घटना

रोखठोक:- तालुक्यातील कोलार पिंपरी येथील 21 वर्षीय युवा शेतकऱ्याने गावालगत असलेल्या गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

अनिरुद्ध बोंडे 21) असे युवा शेतकऱ्यांचे नाव आहे. तो शहरापासून जवळच असलेल्या कोलार पिंपरी येथील रहिवासी होता. शेती सोबतच तो दुधाचा व्यवसाय करीत होता. दि 31 ऑक्टोबर ला रात्री च्या सुमारास गावा लगत असलेल्या गुरांच्या गोठ्यात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळी ही घटना उजेडात आली. या बाबत वणी पोलिसाना माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही पुढील तपास डोमाजी भादिकर करीत आहे.

Previous article22 कोटीच्या मालमत्तेवर 17 संचालकांचा ‘वॉच’
Next articleआणि..परिस्थितीतून सावरण्याचे मिळाले बळ, भावनाविवश शेतकऱ्यांचे उद्गार
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.