Home Breaking News रस्ता बांधकाम कंपनी उठली नागरिकांच्या ‘जीवावर’

रस्ता बांधकाम कंपनी उठली नागरिकांच्या ‘जीवावर’

440

सावधगिरी (precautions) न घेतल्याने घडताहेत अपघात

रोखठोक | वणी- वरोरा मार्गाचे नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. रस्ता बांधकाम कंपनी अतिशय बेजबाबदार पद्धतीने काम करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सावधगिरी (precautions) न घेतल्याने होत असलेल्या अपघातात जखमींची संख्या वाढत असून रस्ता बांधकाम कंपनी नागरिकांच्या जीवावर उठल्याचे स्पष्ट होत आहे.

वरोरा मार्गावर साई मंदिर जवळ रस्त्याचे नव्याने बांधकाम सुरू आहे. एका बाजूचा रस्ता खरडून टाकण्यात आला आहे. बांधकाम कंपनीने सावधगिरी न घेता काम सुरु ठेवले यामुळे त्या मार्गावरील ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांचे अपघात होताहेत.

या मार्गावरून नेहमी मार्गक्रमण करणाऱ्या दोन मुली दुचाकी स्लिप झाल्याने पडल्या, तर एक दुचाकीस्वार अभियंता चांगलाच जखमी झाला आहे. रस्ता बांधकाम करताना वळण रस्ता फलक, किंवा बॅरिकेट्स लावणे गरजेचे आहे. तर सावधगिरी (precautions) बाळगण्याची बांधकाम कंपनीची जबाबदारी आहे.

शहरातील रस्त्याचे बांधकाम करताना संबंधित कंत्राटदाराने नागरिकांचे हित जोपासणे गरजेचे आहे. तसेच नियमानुसार आखण्यात आलेल्या परंपरांचे पालन करावे लागणार आहे. आपल्याच मनमर्जीने नागरिकांना वेठीस धरणाऱ्या बांधकाम कंपनीवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
वणी : बातमीदार