Home Breaking News रोखठोकच्या वृत्ताने बांधकाम कंपनीला आली जाग

रोखठोकच्या वृत्ताने बांधकाम कंपनीला आली जाग

675

सावधगिरी म्हणून लावले बॅरिकेट्स

रोखठोक | वणी- वरोरा मार्गाचे नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. रस्ता बांधकाम कंपनी अतिशय बेजबाबदार पद्धतीने काम करत असल्याचे वास्तव रोखठोक ने प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत बांधकाम कंपनीने तात्काळ बॅरिकेट्स लावले आहे.

रस्ता बांधकाम कंपनी उठली नागरिकांच्या ‘जीवावर’ या मथळ्याखाली रोखठोक ने वृत्तांकन केले होते. कारण बांधकाम कंपनीने सावधगिरी (precautions) न घेता वरोरा मार्गावर साई मंदिर जवळ रस्त्याचे बांधकाम सुरू केले. एका बाजूचा रस्ता खरडून टाकण्यात आला होता मात्र बॅरिकेट्स लावण्यात आले नाही.

PWD च्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त विविध बांधकामे कंत्राटदारांच्या माध्यमातून होत असते. त्या बांधकामावर विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज PWD च्या अधिकाऱ्यांची असते. नियमबाह्य काम करण्यात पटाईत असलेले कंत्राटदार मात्र कोणालाच जुमानतांना दिसत नाहीत की अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताहेत हे तपासणे गरजेचे आहे.

बांधकाम कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे या मार्गावरून नेहमी ये- जा करणाऱ्या दुचकीस्वारांना खरडून टाकलेला रस्ता दिसला नाही यामुळे अपघाताची शृंखला वाढली. एका अभियंत्याला गंभीर दुखापत झाली तर दोन दुचाकीस्वार मुली दुचाकी स्लिप झाल्याने पडल्या त्यांना किरकोळ मार लागला.

रस्ता बांधकाम करताना वळण रस्ता फलक, किंवा बॅरिकेट्स लावणे गरजेचे आहे. तर सावधगिरी (precautions) बाळगण्याची बांधकाम कंपनीची जबाबदारी आहे. याबाबतचे वृत्त रोखठोक मधून प्रकाशित होताच बॅरिकेट्स लावण्यात आले.
वणी: बातमीदार