Home Breaking News चोरटे सक्रिय…शेतातील बंड्यातून कापसाची चोरी

चोरटे सक्रिय…शेतातील बंड्यातून कापसाची चोरी

470

7 क्विंटल कापूस लंपास, मोहूर्ली येथील घटना

रोखठोक |- तालुक्यातील मोहूर्ली येथील शेतातील बंड्यातून 56 हजार रुपये किंमतीचा सात क्विंटल कापूस चोरट्यानी लंपास केला. ही घटना रविवार दि. 4 डिसेंबर ला घडली.

विजय अग्रवाल यांचे मोहूर्ली शेत शिवारात शेत आहे. त्या शेतात त्यांनी कापसाची लागवड केली होती. आता कापूस वेचणीला सुरवात झाली आहे. शेतातून निघालेला सात किंटल कापूस त्यांनी शेतात असलेल्या बंड्यात ठेवला होता.

रविवारी शेतात गडी नसल्याचे पाहून चोरट्यानी बंड्यातील 56 हजार रुपये किंमतीचा सात किंटल कापूस लंपास केला. सोमवारी सकाळी ही बाब लक्षात येताच अग्रवाल यांनी वणी पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
वणी: बातमीदार