● रेस्क्यू पथकाची कारवाई
रोखठोक |- तालुक्यात नरभक्षी वाघाने चांगलाच धुमाकुळ घातला होता. दोघांचा बळी आणि एक तरुण जखमी झाल्यानंतर वन विभाग एक्शन मोड मध्ये आलेत. चाळीस कर्मचारी, ट्रॅप कॅमेरे, पिंजरा आणि डॉट मारून बेशुद्ध करण्याची रणनीती आखण्यात आली. अखेर बुधवार दि. 7 डिसेंबरला सकाळी नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे.
तालुक्यात सातत्याने आढळणारा वाघ कालांतराने नरभक्षी झाला होता. त्याने काही दिवसांपुर्वी रांगणा भुरकी येथील अभय देवूळकर या युवकाला ठार केल्यानंतर दि. 27 नोव्हेंबरला कोलार पिंपरी येथील रामदास पिदूरकर (58) यांचेवर हल्ला चढवला त्यात त्यांना जीव गमवावा लागला. तर ब्राम्हणी येथे टॉवरचे काम करणाऱ्या उमेश पासवान या मजुरांवर वाघाने हल्ला चढवला होता त्यात तो गंभीर जखमी झाला होता.
तालुक्यात नरभक्षी वाघाने चांगलाच हैदोस माजविल्यानंतर वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी विव्हरचना आखली. पुसद येथील पथक, पांढरकवडा येथील मोबाईल स्कॉड, रेस्क्यू पथक व वणी येथील अधिकारी व कर्मचारी सज्ज झालेत. मागील आठ दिवसापासून त्या नरभक्षी वाघाच्या मागावर होते. या करिता ट्रॅप कॅमेरे, पिंजरे कोलार पिंपरी परिसरातील जंगलात लावण्यात आले होते.

बुधवारी सकाळी रेस्क्यू पथकाच्या निदर्शनास तो वाघ आला. त्याला डॉट मारून बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. नरभक्षी वाघाला पकडण्यात आल्यामुळे नागरिक, शेतकरी, शेतमजूर व वेकोली कर्मचारी यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्या वाघाला नागपूर येथे हलविण्यात येणार आहे, या कारवाई ने वन विभागाचे कौतुक होत आहे.
वणी: बातमीदार
ही बातमी सुद्धा महत्वाचीच…तुम्ही वाचा..
बापू….. नरभक्षी वाघाला जेरबंद केलेल्या गावातच पुन्हा पशुधनावर ‘हल्ला’