● कायर परिसरातील घटना
रोखठोक |- मुकुटबन येथून आपले कर्तव्य पार पाडून गावी जात असलेल्या युवकाचा भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रक वर दुचाकी आदळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
पवन गोवारदीपे (25) रा गोडगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मुकुटबन येथील एका कंपनीत कामाला होता. दि 24 डिसेंबर ला आपले कर्तव्य करून आपल्या दुचाकीने गावाकडे जाण्यासाठी निघाला होता.
कायर गावाजवळ नादुरुस्त असलेला ट्रक उभा होता. अंधारामुळे पवन ला उभे असलेले वाहन दिसले नाही आणि भरधाव दुचाकी उभ्या ट्रक वर आदळली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
वणी : बातमीदार
