● 63 हजाराचा मुद्देमाल जप्त
रोखठोक | वणी ते रासा मार्गावर शेतालगतच्या नाल्यात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर वणी पोलिसांनी धाडसत्र अवलंबले. यावेळी सहा जणांना अटक केली असून 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवार दि. 25 डिसेंबर ला करण्यात आली.
तालुक्यातील अनेक गावात लपून छपुन कोंबड्याच्या झुंजी लावून जुगार खेळला जातो. पोलिसांनी अनेकदा या आंबट शौकिनांवर कारवाई देखील केली आहे. मात्र हे जुगारी ऐकताना दिसत नाही.
रविवार दि 25 डिसेंबर ला मारेगाव (कोरंबी) शिवारात कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती ठाणेदार प्रदीप शीरस्कर यांना मिळाली होती. त्यावरून PSI आशिष झिमटे हे आपल्या पथकासह रवाना झाले.

वणी – रासा मार्गावर असलेल्या शेता लगतच्या नाल्यात कोंबड्याची झुंज लावून जुगार खेळल्या जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी धाड टाकून अक्षय डोळसे, सचिन डाहूले, संजय खोके,लक्ष्मण खोके, धनंजय वैध, सर्व राहणार मारेगाव कोरंबी, मोहन कुचनकर रा विरकुंड यांना ताब्यात घेत यांच्या जवळून नगदी रुपये, 4 मोबाईल, दुचाकी, तीन कोंबडे, असा एकूण 63 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वणी : बातमीदार